तब्बल दाेनशे अब्ज रुपयांच्या मुद्रांक घाेटाळ्यातील प्रमुख अाराेपी अब्दुल करीम तेलगी चे गुरुवारी बंगळुरूमध्ये निधन झाले.हा घाेटाळा 2004 ते 2006 दरम्यान उघडकीस अाला. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसचे तत्कालीन महाव्यवस्थापक गंगाप्रसाद यांच्याशी संगनमत करून त्याने मुद्रांक छपाईचे एक यंत्र भंगाराच्या भावात मिळवले हाेते.तुरुंगात असताना अाधीच एड्स आणि मधुमेहाने त्रस्त असलेल्या तेलगीला मेंदूज्वराच्या उपचारासाठी व्हिक्टाेरिया रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. गेल्या चार दिवसांपासून ताे व्हेंटिलेटरवरच हाेता. एक- एक अवयव निकामी हाेत गेल्याने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे तेलगी ने बनावट स्टॅम्प पेपर बँक, विमा कंपन्या, फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि शेयर ब्रोकिंग कंपन्यांना विकले. या प्रकरणात तेलगीने 12 राज्यांत 20,000 कोटींचा घोटाळा केला तेलगीच्या नार्को टेस्टमध्ये त्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, छगन भुजबळ अशा अनेक नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews